महाराष्ट्र पोलिस दलाची रचना (Structure of the Maharashtra Police Force): नमस्कार आपण आज महाराष्ट्र पोलीस दलाचे रचना पाहणार आहोत यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस दलाची मानचिन्हे कोणती महाराष्ट्र पोलीस दलाचे ध्वजाची रचना कशी आहे ब्रीदवाक्य काय आहे पोलीस दलाची रचना नेमकी कशी असते पोलीस प्रशासन व्यवस्था कशी असते पोलीस आयुक्तालय किती आहेत जिल्हा पोलीस दलाची रचना कशी असते ग्रामीण पोलीस दलाची रचना कशी असते परिक्षेत्राची रचना आणि परिक्षेत्र म्हणजे काय याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत
- राज्यशासन (गृहमंत्रालय)
- पोलीस महासंचालक (DGP-IGP)(संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख)
- अतिरिक्त पोलीस महासंचालक (Add. DGP)
- विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP)
- अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (Add. IGP)
- पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)
- पोलीस अधीक्षक (SP/DCP)
- अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Add. SP)
- पोलीस उपअधीक्षक (Dy. SP)
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI)
- पोलीस निरीक्षक (PI)
- सहायक पोलीस निरीक्षक (API)
- पोलीस उपनिरीक्षक (PSI)
- सहायक पोलीस उपनिरीक्षक (APSI)
- पोलीस हवालदार (PHC)
- पोलीस नाईक (PN)
- पोलीस शिपाई (PC)
महाराष्ट्र पोलिस दलाची मानचिन्हे
महाराष्ट्र राज्याचा पोलिस ध्वज

1. पोलीस दलाच्या ध्वजाची रचना :
- महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे.
- सभोवती पांढऱ्या रेशमी कपड्याची किनार असून मध्यभागी तारा आहे.
- ताऱ्याच्या मध्यभागी दोन वर्तुळे एकात एक अशी असतात.
- यामध्ये हाताचा पंजा असतो व ताऱ्याचे खालील बाजूस ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय‘ हे ब्रीदवाक्य लिहिलेले असते.
- पंचकोनी तारा : तारा हे पोलिसांचे पारंपरिक चिन्ह आहे.
- व्दिवर्तुळात्मक ढाली : ह्या संरक्षणाचे प्रतीक आहेत.
- हाताचा पंजा : हा अभय दर्शविणारा आहे.
2. ब्रीदवाक्य :
- महाराष्ट्र पोलीस दलाचे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असून त्याचा अर्थ सद्रक्षणाय म्हणजे चांगल्या गोष्टीचे रक्षण.
- खलनिग्रहणाय म्हणजे दुष्ट व वाईट गोष्टींचा नायनाट करणे किंवा त्या समूळ नष्ट करणे.
3. पोलीस दलाची रचना :
- महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० साली झाली असली तरी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा इतिहास फार प्राचीन आहे.
- जरी भारतीय पोलीस कायदा १८६१ साली अस्तित्वात आला असला तरी त्या आधीपासून महाराष्ट्रात पोलीस अस्तित्वात होते.
- पूर्वी हे दल मुंबई राज्य पोलीस दल या नावाने ओळखले जात असे. सध्या अस्तित्वात असलेला मुंबई पोलीस कायदा १९५१ साली पास झाला. या कायद्याने या पोलीस दलाची कार्यकक्षा निश्चित केली.
- आपल्या देशात महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकिक आहे. या संपूर्ण दलाच्या प्रशासनाची धुरा पोलीस महासंचालकांच्या हाती आहे. त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात खालील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाचे शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस असे दोन भाग पडतात.

पोलीस आयुक्तालय :
- ज्या शहराची लोकसंख्या पाच लाखापेक्षा अधिक आहे अशा शहराकरिता राज्यशासनामार्फत पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात येते.
- या ठिकाणचे प्रमुख शहर पोलीस आयुक्त या नावाने ओळखले जात असून त्यांना विशेष दंडाधिकारी म्हणून दर्जा प्राप्त असतो.
मुंबई पोलीस आयुक्तालय : मुंबई पोलीस आयुक्तालय हे राज्यातील सर्वात पहिले व सर्वात मोठे पोलीस आयुक्तालय आहे. या ठिकाणचे पोलीस आयुक्त पद हे उपमहानिरक्षिक दर्जाचे आहे. या ठिकाणची प्रशासकीय रचना ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे.
इतर पोलीस आयुक्तालये : राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयात खालीलप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे.
ठाणे, नागपूर आणि पुणे या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांचा दर्जा हा विशेष पोलीस आयुक्त पदाचा आहे.
वरील तीनही शहरे वगळता इतर सहा ठिकाणच्या पोलीस आयुक्तांचा दर्जा हा उपमहानिरीक्षक पदाचा आहे.
- नाशिक परिक्षेत्र : यामध्ये नाशिक (ग्रामीण), जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्याचा समावेश होतो.
- अमरावती परिक्षेत्र : यामध्ये अमरावती ग्रामीण, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलढाणा या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नागपूर परिक्षेत्र : यामध्ये नागपूर (ग्रामीण), वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्याचा समावेश होतो,
- औरंगाबाद परिक्षेत्र : यामध्ये औरंगाबाद (ग्रामीण), जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.
- कोल्हापूर परिक्षेत्र : यामध्ये कोल्हापूर, पुणे (ग्रामीण), सोलापूर (ग्रामीण), सातारा, सांगली या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
- ठाणे परिक्षेत्र : यामध्ये ठाणे (ग्रामीण), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नांदेड परिक्षेत्र : यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.